नूतन ग्रुपच्या तीन विद्यार्थ्यांची वेरिटास टेक्नॉलॉजिस कंपनीत निवड

0 झुंजार झेप न्युज

• आर्थिक मंदीच्या काळात १५.७८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज

पिंपरी चिंचवड,पुणे,दि.17: पीसीईटी - नूतन ग्रुपच्या तीन विद्यार्थ्यांची वेरिटास टेक्नॉलॉजिस या नामांकीत कंपनीत निवड झाली आहे. आर्थिक बंदीच्या काळात १५.७८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणे हे गौरवास्पद आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट - नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व तळेगांव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एनएमआयईटी व एनसीईआर) अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता वेरिटास टेक्नॉलॉजिस या नामांकित कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या म्हणजेच २०२४ बॅचच्या ३ विद्यार्थ्यांची असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदी निवड झाली. या ३ विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असताना शेवटच्या सेमिस्टर दरम्यान इंटर्नशिपची संधी देखील देण्यात आली असून या इंटर्नशिपच्या कालावधी मध्ये ३२,००० रुपयांचे मासिक स्टायपेंड देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या केतन सरोदे, संदेश मुंढे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या द्रोण रहांगदळे यांचा समावेश आहे. यावेळी व्हेरिटास कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी निरंजन काळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. मंदीच्या काळात देखील पीसीईटी - नूतन ग्रुपच्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत हे अभिमानास्पद असून पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे असे या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी आदी उपस्थित होते.

पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, ही निवड प्रक्रिया चार स्तरांमध्ये पार पडली. पहिला राउंड म्हणजे ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल व कोडिंग स्किल्स इत्यादींचा समावेश होता. दुसरा राउंड हा टेक्निकल इंटरव्हयू, तिसरा राउंड हा मॅनेजेरिअल इंटरव्हयू आणि अंतिम राउंड हा एच आर इंटरव्हयू चा होता. वेरिटास टेक्नॉलॉजिस ही अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनी असून कॅलिफोर्निया येथे तीचे मुख्यालय आहे. वेरिटास टेक्नॉलॉजिस ही एंटरप्राईज डेटा मॅनेजमेंट या क्षेत्रातील अग्रणी सॉफ्टवेअर कंपनी आहे. जगभरातील ५८ देशांमध्ये कंपनीची कार्यालय असून ७,००० पेक्षा अधिक कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दिपक पवार, प्रा. विजय टोपे, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. हीना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर, सर्व विभागातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी योगदान दिले. 

डावीकडून प्रा. अनिकेत परदेशी , प्रा. दीपक पवार , द्रोण रहांगदळे, संदेश मुंढे, डॉ. शीतलकुमार रवंदळे, श्री निरंजन काळे, केतन सरोदे, प्रा. ऋषिकेश पांडे, व प्रा. विजय टोपे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.