"दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी"
पिंपरी चिंचवड,दि.20: महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभागाचा शासन निर्णय दिनांक २३ मे, २०२३ नुसार "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभागाचा शासन निर्णय दिनांक २८ जुलै २०२३ नुसार मंगळवार दि. २२ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे पुणे जिल्हयात विविध विभागातील कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचे लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहेत.मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, विधानसभा सदस्य, अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक राज्यस्तरीय समिती (मंत्री दर्जा) यांच्या प्रमुख उपस्थितीत "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी विविध विभागांचे स्टॉल लावले जाणार असून उपस्थित दिव्यांग बांधवांची नांव नोंदणी, मार्गदर्शन, योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती इ. वर संवाद केला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

