• नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आपल्या सेवेची 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सन्मान
पिंपरी चिंचवड,दि.25: सर्वप्रथम आपल्या सर्वांचे दैवत आणि नुकतेच ज्यांना राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले रतन टाटा साहेब यांना वंदन.1995 पासून टाटा मोटर्स कंपनीशी जुळलेला ऋणानुबंध आजतागायत 28 वर्षानंतरही अबाधित आहे. हे माझे भाग्यच. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य गरीब माणसाला जगण्याचा आधार या टाटा मोटर्स समूहाने दिला. फक्त आधारच नव्हे तर सामाजिक, आर्थिक स्थैर्य आणि सन्मान या दोन्ही आम्हाला मिळवून दिला.
टाटा मोटर्स कंपनीत काम करत असताना विश्वासहर्ता आणि माणसे जोडण्याची कला आम्हांला शिकविण्यात आली. आणि त्यामुळे नगरसेवक झाल्यानंतरही जमिनीवर पाय ठेवून आणि माणुसकीची नाळ जोडून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. याचेही श्रेय टाटा मोटर्स कंपनीला जाते. कारण कंपनीने कामगार नव्हे तर माणसं घडवली आहेत.
या समुहाचा आपणही एक भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.या कार्यक्रमाप्रसंगी एच आर विभागाचे सर्व अधिकारी, युनियनचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

