जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
बुलडाणा,दि.03: जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.तहसीलदार संजीवनी मोफळे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रिया सुळे, गजानन मोतेकर, हरिदास थोलबरे, सिद्धू परिहार यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.
स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन
नोंदणी करण्याचे आवाहन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी नाविन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली दि. 2 ऑगस्ट 2023 ते दि. 31 ऑगस्ट 2023 या कालावधीपासून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातून राज्यात स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याकरिता इनक्यूबेटरची स्थापना आणि विस्तार, गुणवत्ता परीक्षण आणि बौद्धिक संपदा हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रेड चॅलेंज स्टार्टअप वीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यात सहभागी होण्याकरिता msins.in, schemes.msins.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेण्याचा आणि त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साध्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी उपक्रम आहे. कोणत्याही संस्था, तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी पात्र आहेत.
जिल्ह्यातील महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन चलेंजमध्ये सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष अथवा 07262-242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

