भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड जॉगिंग ट्रॅक मध्ये आयुक्त शेखर सिंह ह्यांनी स्वतः वाकिंग करण्यासाठी येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा : सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.04: निगडी फ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड जॉगिंग ट्रॅक लाखो रुपये खर्च करून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी बांधण्यात आला असून त्या ठिकाणी गवत झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढले असून जॉगिंग ट्रॅक झाडा झुडपानी वाढलेल्या अवस्थेत असून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असून जॉगिंग ट्रॅक मध्ये गवत झाडे झुडपे वाढलेली असल्याने मच्छर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून आरोग्य प्रश्न निर्माण झाला असून त्या ठिकाणी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड जॉगिंग ट्रॅक ह्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच जॉगिंग ट्रॅक मध्ये वाकिंग करण्यासाठी येऊन प्रशासकीय राजवटीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कशा प्रकारे कारभार करत आहे.
ह्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतः येऊन पाहणी करण्यात यावी निगडी येथील यमुनानगर स्कीम नंबर 11 तसेच सेक्टर 22 मधील नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्या ओपन जीम साहित्य चोरीला गेले असून त्या ठिकाणी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन नवीन ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी नागरिकांना सकाळ संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच भक्ती शक्ती ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड जॉगिंग ट्रॅक स्वच्छता अभियान राबविण्यात यावी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात यावी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्यांना स्वच्छता अभियान राबविण्यात आले म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी भागातील भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड जॉगिंग ट्रॅक मधील दुरावस्था कशा प्रकारे झाली त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित आरोग्य अधिकारी व आरोग्य निरीक्षक ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक स्वच्छता करण्यात येईल ह्याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी स्वतः दखल घेऊन कारवाई करण्यात यावी.

