मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
परभणी,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
प्रशासकीय इमारत येथेत ध्वजारोहण संपन्न
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत आयोजित ध्वजारोहण समारंभात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप अधीक्षक भूमी अभिलेख दत्तु सोनवणे, तसेच प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा हायस्कूलचे शिक्षक विलास खिल्लारे यांच्यासह विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.

