राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील सार्वजनिक मंडळे,संस्था व सोसायट्यांसाठी गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन
पिंपरी चिंचवड,दि.17: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहरच्या (जिल्हा) वतीने या वर्षीपासून शहरातील मंडळे, सोसायट्यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. एका निवेदनाद्वारे ही माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.
ही स्पर्धा थाटामाटात पार पडणार असून बक्षिसेही मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 75 हजार, तृतीय क्रमांकास 50 हजार तर उत्तेजनार्थ विजेत्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढील नियम व अटी असतील.
1. सार्वजनिक गणेशोत्सव करणारी मंडळे संस्था गृहरचना सोसायटी, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील असावे.
2. मंडळ / संस्था / सोसायटी त्या त्या विभागात नोंदणीकृत असावेत.
3. सहभागी मंडळ / संस्था/ सोसायटी यांनी शासकिय नियम पालन केलेले असावेत.
4. पंचानी दिलेला निकाल हा अंतिम असेल.
स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023 असेल. अर्ज मिळण्याचे व भरून देण्याचे ठिकाण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी असून अर्जासाठी 500 रु. इतके शुल्क असेल. तरी जास्तीत जास्त मंडळे, संस्था, गृहनिर्माण सोसायटयांनी या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

