राष्ट्रीय सोलर व्हेईकल चॅलेंज स्पर्धेत 'पीसीसीओई' चा दबदबा

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रीय सोलर व्हेईकल चॅलेंज स्पर्धेत 'पीसीसीओई' चा दबदबा

पिंपरी चिंचवड,पुणे, दि.16: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) सोलार इलेक्‍ट्रिक आधारित प्रयोगशील वाहन निर्मिती करण्यात आघाडीवर असणाऱ्या टीम सोलारीयम ने डायनॅमिस्ट मोटर स्पोर्ट्स इंडिया द्वारा आयोजित राष्ट्रीय सोलर व्हेईकल चॅलेंज स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले तसेच अन्य चार विभागातही विजेतेपद पटकावून आपला दबदबा सिद्ध केला.  

टीम सोलारीयमने अंतिम विजेतेपदासह सर्वोत्तम सौर कामगिरी, सर्वोत्तम ऑटो क्रॉस, सर्वोत्तम व्यवसाय योजना, रनर अप एन्ड्युरन्स/ रॅली या विभागात आपले प्रभुत्व सिद्ध केले. पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. कॉलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठतेची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सोलार इलेक्‍ट्रिक क्षेत्रामधील भारतातील प्रमुख संघांनी भाग घेतला.  

टीम सोलारीयमला संघ मार्गदर्शक डॉ. जया गोयल, प्रा. प्रमोद सोनवणे, प्रा. अशोक गाडेकर यांचे तसेच पीसीसीओईचे संचालक डॉ.गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पद्माकर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.