बिर्याणी पार्सल का देत नाही या कारणावरून कोयत्याने वार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड, दि.18: दि.16/10/2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन कडील CR NO 1068/2023 आयपिसी 324 आर्म ॲक्ट 4(२५)मधील आरोपी यांनी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत फिर्यादी नामे अब्दुल रहीम मुश्ताक अली रा गल्ली नो 3, अश्रफ नगर , कोंढवा, पुणे यांचे ख्वाजा गरीब नवाज बिर्याणी हाऊस या दुकानावर सकाळीं 07.30 वा जाऊन बिर्याणी पार्सल का देत नाही या कारणावरून आरोपी १) आयान शेख 19 वर्ष 2) अली शेख 20 वर्ष 3) अर्ष मुलांनी 19 वर्ष या तिघांनी मिळून कोयत्याचा धाक दाखविला तसेच फिर्यादी याचे हातावर कोयत्याने वार केला म्हणून गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हाच्या अनुषंगाने मा वरिष्ठांचे आदेशाने श्री लेखाजी शिदे सहा पोलिस निरीक्षक तपास पथक यांचे मार्गदर्शना खाली तपास सुरू केला असता अमोल हिरवे पोलिस हवालदार यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी 1 व 2 हे अलिफ टॉवर समोर मोकळे पटांगणात बसले आहेत म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.तर पाहिजे आरोपी अर्ष मुलाणी 19 वर्ष याचा शोध सुरू आहे .सदर कामगिरी श्री संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली श्री लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक , पो हवा हिरवे, पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम शशांक खाडे तपास पथक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

.jpeg)