विजयादशमी निमित्त साई मंदिरात भाविकांची गर्दी

0 झुंजार झेप न्युज

विजयादशमी निमित्त साई मंदिरात भाविकांची गर्दी 

पिंपरी चिंचवड,पुणे,दि.25: विजयादशमी व श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे - आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता झालेल्या माध्यान्ह आरतीनंतर श्रींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार पासून सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता गुरुवारी संध्याकाळी ७ वा. धुपारती, ७:३० ला निमंत्रित कलाकारांच्या कार्यक्रम, रात्री १० वा. पालखी प्रदक्षिणा नंतर श्रींची शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल.  

विजयादशमीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण सांगता सोहळा, रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, भजन कार्यक्रम यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती झाली. आरती नंतर महाप्रसाद, श्रीं चे नामस्मरण, श्रीं ची प्रार्थना व दीपज्योत, नंतर ४:३० वाजता सिमोल्लंघन व मिरवणूक, श्रीं ची पालखी, धुपारती, निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम व श्री हरिजागर रात्री दहा वाजता असे धार्मिक कार्यक्रम झाले अशी माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणेचे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.