छत्रपती चौक ते साई सागर कॉलनी पर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

0 झुंजार झेप न्युज

छत्रपती चौक ते साई सागर कॉलनी पर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

पिंपरी चिंचवड,दि.03: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत. भाजप शहराध्यक्ष मा.श्री शंकरभाऊ पांडुरंग जगताप व आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली... एक_तारीख_एक_तास श्रमदान या उपक्रमात PCMC ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत रहाटणी मध्ये छत्रपती चौक ते साई सागर कॉलनी पर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

यावेळी प्रभाग क्रमांक 27 मधील नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे, रहाटणी - सांगवी मंडलाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे , आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे,आरोग्य कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक व महिला बचत गट उपस्थित होते...या यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.