शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

0 झुंजार झेप न्युज

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पिंपरी चिंचवड,दि.03: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाच्या सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार आहे.

तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे निवेदन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.