महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कलावंत सुहास दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन गौरव...

0 झुंजार झेप न्युज

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कलावंत सुहास दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन गौरव...

पिंपरी चिंचवड,दि.२0 : पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी रंगभूमी, लोककला आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ कलावंत, अभिनेते व दिग्दर्शक सुहास दामोदर जोशी यांना आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुहास जोशी यांनी मराठी रंगभूमी, लोकनाट्य, एकांकिका, निवेदन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ५० हून अधिक नाटके आणि ४० हून अधिक एकांकिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल गंध, बोलीभाषेतील सहजता आणि व्यक्तिरेखांमधील वास्तवता ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये आहेत.

कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक महोत्सवांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ५० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. लोककला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.