मराठा समाज बांधवांच्या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचां जाहीर पाठिंबा

0 झुंजार झेप न्युज

मराठा समाज बांधवांच्या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचां जाहीर पाठिंबा

हिंगोली,दि.28: मराठा समाज बांधवांच्या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचां जाहीर पाठिंबा,आमदार खासदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करन्याची मागणी तसेच विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी कळमनुरी मार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथरावजी यांना दिले निवेदन..!कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृवात महाराष्ट्रभर होणाऱ्या मराठा आरक्षण आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.मराठा आरक्षण बाबत फक्त कोणतीही आलेले नवीन सरकार मतदानाच्या वेळी आरक्षण देऊ म्हणून मराठा समाजाची फक्त मतदान पुरता वापर करून घेतला आहे.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषण या मागणीसाठी सुरू असून कळमनुरी येथे युवा तरुण राजू चंद्रवंशी तहसील कार्यालय कळमनुरी येथे करीत असून त्यांना सुद्धा पाठिंबा दिला आहे.

तसेच कळमनुरी तालुक्यात ज्या युवा तरुणांनी आपले जीवन संपविले यास जबाबदार समजून कळमनुरी आमदार,हिंगोली,खासदार यांना समजण्यात येऊन त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल व्हावे कारण मराठा आरक्षणासाठी यांच्याकडून एक लोकप्रतिनिधी या नात्याने कोणत्याही प्रकारची दखल घेत कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही,यामुळे यास यांना जबाबदार समजून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल व्हावे.कळमनुरी तालुक्यातील गाव देवजना येथील कृष्णा कल्याणकर या युवकांने गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपविले यांच्या कुटुंबास 50 लाखाची मदत तसेच अपघाती निधन झालेला मंगेश काळे गाव येळेगाव तुकाराम यांच्या कुटुंबास 50 लाख तर सोबत जखमी झालेला तरुण सचिन काळे या कुटुंबास 10 लाख एवढी मदत जाहीर करावी.सरकारने आरक्षण द्यावे, सरकार आरक्षणाबाबत फक्त ढोंगी पण करीत असून आरक्षण जाहीर करीत नाहीत.अनेक वेळा तरुणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले असून याला सर्वस्वी जबाबदार ही सरकार आहे.लवकरात लवकर या प्रश्नावर उपाय काढत नसळ्यामुळे अनेक युवा तरुण आत्महत्या करून आपले जीवन संपवित आहेत.या सर्व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी कळमनुरीतील शेकडो कार्यकर्ते घेऊन तालुक्यात तीव्र आंदोलन करतील व यास शासन व प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन आज 27/10/2023 रोजी उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना देण्यात आले.!

यावेळी वंचितचे डॉ.दिलीप मस्के नाईक(जि.उपाध्यक्ष),अँड.सतीश पंडित (जी.सचिव),शेख अफजलभाई (माथाडी जी.अ),डॉ.सुरज राठोड (जी.संघटक), कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे,शहर अध्यक्ष शकील भाई पठाण,शिवाजी भुतणर (ता.उपाध्यक्ष),काशिनाथमामा साळवे (माथाडी ता.अध्यक्ष),शेख शहबाज(युवा श.सचिव),शेख साजिद(श.सचिव),जितेश कदम(श.सचिव),दिनेश पाईकराव(श.प्रवक्ता )व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कळमनुरी वंचित बहुजन आघाडी तालुका कळमनुरी जि.हिंगोली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.