• श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जय गणेश रुग्णसेवा अभियान यांच्या सहकार्याने
पुणे,दि.28: दिनांक 27/10/ 2023 वार शुक्रवार रोजी लायन्स क्लब ऑफ पुणेआय फाउंडेशन स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित,माय माऊली केअर सेंटर पुणे समता फाउंडेशन मुंबई व एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत, मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया असे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते श्रीकृष्ण टॉकीज जवळ बुधवार पेठ पुणे 85 देवदासी महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
5 महिलांची मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी नोंद झाली. त्या सर्व महिलांचे पूर्णतः मोफत ऑपरेशन केले जाईल या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे राजेंद्र परदेशी, संस्थापक, अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज व डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन ला. विठ्ठलराव वरुडे पाटील आणि मंडळाचे कार्यकर्ते कर्मचारी व मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

