शारीरिक आणि मानसिक समस्यांनावर मात देण्यासाठी सहा दिवसांचे शिबिर 19 नोव्हेंबरपासून

0 झुंजार झेप न्युज

शारीरिक आणि मानसिक समस्यांनावर मात देण्यासाठी सहा दिवसांचे शिबिर 19 नोव्हेंबरपासून

पुणे,दि.16: चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आज आपला समाज अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना निमंत्रण देत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आता आली असून त्यासाठीचे सोपे आणि व्यवहार्य मार्गात शारीरिक आणि मानसिक समस्यांनावर मात देण्यासाठी काय काय करावे यासाठी पुण्यात सन टु ह्युमन फाउंडेशन तर्फे सहा दिवसाचे नए दृष्टिकोण वाला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात पूज्य परम आलयजी प्रवाचन नाही तर प्रयोग करणार आहेत. सहभागी होणार्‍या व्यक्तींना रोजच्या सत्रानंतर साधा आरोग्यदायी अल्पोपहार देण्यात येईल. या अदृश्य अल्पोपाहारात आपल्या शरीराला आवशयक असलेले प्रथिने कर्बोदके, ऊर्जा असे अत्यंत महत्वाचे घटक समाविष्ट असतील. आजवर जगात विविध ठिकाणी मिळून अशी 250 शिबिरे आयोजित झाली असून सहभागी व्यक्तींना त्यांच्या भावनिक आणि शारीरिक व्यथांपासून सुटका झाली आहे.

आणि आता ते प्रेम आणि आनंदाने भरलेले जीवन व्यतीत करीत आहेत.हे शिबिर वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी -कोंढवा रस्ता, पुणे येथे 19 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार असून त्याची वेळ सकाळी 6.30 ते 8.30 अशी आहे. शिबिरासाठी कसलेही शुल्क नाही. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी ttps://forms.gle/pdsTLBrzY56f9nh86 येथे नाव नोंदवावे किंवा मीरा 8827453884, तारिणी 8359976000 अथवा श्रावण डहीर्रींरप 9669288957 यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.