रोडवरील पार्क केलेल्या गाड्या चोरी करणाऱ्या सराईत आरोपी कोंडवा पोलिसांकडून अटक
पुणे,दि.13: कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून अचानक वाहन चेक करून पोलिसांचे वाहनांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले यांनी सूचना दिल्या होत्या. सदर सूचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाची शिंदे, पोलीस निरीक्षक दिनेश पाटील,पोलिस अंमलदार अमोल हिरवे,राहुल वंजारी,सुहास मोरे,राहुल थोरात,अभिजीत रत्नपारखी,जयदेव भोसले,विकास मंगळे,शशांक खाडे, आशिष गरुड,रोहित पाटील,राहुल रासगे असे गुप्त बातमीदारा मार्फतीने रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग करून तसेच वयाने कमी असणारे जी मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासून वाहन चेक करून चोरीच्या वाहनांचा शोध घेत असताना दि.07/11/2023 रोजी आशीर्वाद चौकात आलो असताना पोलीस आमदार सुहास मोरे,राहुल थोरात,जयदेव भोसले,विकास मरगळे यांना गुप्त माहिती मिळाली होती. की एक ग्रे रंगाची जर्किंग घातलेला इसम हा खडीमशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी थांबलेला असेल त्याच्याकडून असणारे पांढऱ्या रंगाची मोटरसायकलवर नंबर प्लेटमध्ये मोटरसायकल विकण्यासाठी तो ग्राहक शोधत असून गाडीची कागदपत्र नंतर देत असे सांगत आहे त्याच्याकडे असणारे मोटरसायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे तेव्हा स्टाफच्या मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केले असता खडीमशीन चौकातील चहाचे टपरीच्या शेजारी एक इसम दिसून आला त्याला पकडण्याकरिता गेला असता त्याला चाहूल लागली तो वॉककंपाऊंड वरून उडी मारून पळून जाऊ लागला तेव्हा त्यास वरिष्ठ च्या मदतीने पकडून त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारत अमर अलीम शेख वय पंचवीस वर्षे राहणार नवजीत पार्क जवळ मदिना मंदिर बिल्डिंग कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. सदर इसमाकडे असणाऱ्या मोटरसायकल बाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीच्या व असमानधारक उत्तरे देऊ लागला तेव्हा त्यास पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे सखोल तपास केला असता. सदर इसमाकडे मिळून आलेल्या गाडीही कोंडा पोलीस ठाण्यांमध्ये येथून ११३१/२०२३ भादवी कलम 379 प्रमाणे दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपी हा रेकॉर्डवरील वाहन चोरी करणारा त्याच्याकडे सखोल तपासणी करून त्याच्याकडून एम एच बारा एल आर 57 51 होंडा एक्टिवा मोपेड दुसरी एम एच बारा टी एम ०७५३१ एम एच बारा बी क्यू ०३२२ एक्टिवा एम एच बारा जी 43 50 70 एम एच बारा एक्स २१ २१ यामाहा अशा एक लाख पन्नास रुपये 50 हजार रुपये किमतीचे एकूण पाच मोटर चोरीच्या मोटरसायकल चोरी केली निष्पन्न करून पुढील प्रमाणे गुन्हे उघडतील झाले आहे.
- कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरण ११३१/२०२३ भादवी कलम 379
- कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.1134/2023 भादवी. कलम 379
- कोंडा पोलीस ठाणे पुणे गुरन.1140/2023 भादवी. 379
- लष्कर ठाणे पुणे गुरन.257/2023 भादवी. कलम 379
- लष्कर ठाणे पुणे गुरन. 229/2023 भादवी. कलम 379
वरील प्रमाणे कामगिरीही माननीय रितेश कुमार सहायक, पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक, सह पोलिस आयुक्त रंजन शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय विक्रांत देशमुख,पोलीस उप आयुक्त परी ०५मा.शाहूराव साळवे,पोलीस आयुक्त वनवाड विभाग संतोष सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले,पोलीस निरीक्षक गुन्हे यांचा मार्गदर्शनाखाली व सूचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

