नामदेवराव जाधव यांना z दर्जाचे सुरक्षा देण्यात यावी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी चिंचवड,दि.18: नामदेव जाधव ह्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार गटाने तोंडाला काळे फासले असून मारहाण केली असून सदर घटना गंभीर असून महाराष्ट्र व देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे किंवा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येत असून मारहाण करून दडपशाही सुरू असून शरद पवार ह्यांच्या विरोधात कोणी कार्यकर्ते किंवा नेता ह्यांनी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये किंवा घोषणा केली तर शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्रात गंभीर मारहाण करून तोंडाला काळे फासले जात असून शरद पवार ह्यांच्या विरोधात बोलणं नामदेव जाधव ह्यांना महागात पडले असून पोलिस संरक्षण देण्यात आले होते तरीही शरद पवार गटाने नामदेव जाधव यांच्या विरोधात मारहाण करून तोंडाला काळे फासले असून शासन पुरस्कृत हल्ला करण्यात आला.
नामदेव जाधव ह्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात यावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन नामदेव जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी राज्य सरकारने नामदेव जाधव ह्यांच्या विरोधात हल्ला केला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नामदेव जाधव भक्कम बाजू मांडत असताना पुरावे सादर केल्यामुळे शरद पवार गट अस्वस्थ झाला होता त्यामुळे नामदेव जाधव ह्यांच्या विरोधात मारहाण करून तोंडाला काळे फासले असून शरद पवार ह्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या किंवा घोषणा देणाऱ्या कार्यकर्ते किंवा नेते मंडळी ह्यांना पोलिस संरक्षणात मारहाण करणे गंभीर प्रकार घडला असून त्या संदर्भात एस आय टी चौकशी करून पोलिस निलंबित करण्यात यावे तसेच नामदेव जाधव ह्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नामदेव जाधव भविष्यात जोरदार भक्कम बाजू आरक्षण संदभात मांडतील त्या मुळे शरद पवार अस्वस्थ झाले.
असून त्यांनी कार्यकर्ते ह्यांच्या द्वारे शासन पुरस्कृत हल्ला केला असून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

