पैठण तालुक्यातील तेलवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पैठण : पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील (14 वर्षीय) अल्पवयीन मुलीवर येथील दोन नराधमांनी अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबांना भेट देऊन पैठण पोलीस स्टेशन येथील प्रशासनाशी चर्चा केली, व पीडित कुटुंबाला आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत असा धीर दिला.
यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, तालुका अध्यक्ष सुनील साळवे, युवक तालुका अध्यक्ष पैठण पंकज गायकवाड, शहराध्यक्ष अनिल शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

