पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची बातमी प्रसारीत होताच, शिवाजीनगर पोलीसांकडुन ४ तासात आरोपी अटक केले असता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे कारणावरुन मारहाण केल्याचे उघड
पुणे,दि.28: दिनांक २६/०२/२०२४ रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत भारत पेट्रोल पंप, मनपा जवळ, पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची बातमी प्रसारीत होताच मा. पोलीस उपआयुक्त परि.०१ श्री. संदीपसिंह गिल्ल, सपोआ विश्रामबाग विभाग वसंत कुंवर यांनी भेट देवून शिवजीनगर पोलीस स्टेशनचे वपोनि चंद्रशेखर सांवत यांचे नेतृत्वाखालील टिमला तात्काळ गुन्हेगारांना पकडण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर पेट्रोल पंपाचे मालक श्री. सचिन अनिल शहा यांना बांबुने डोक्यावर मारहाण झाल्याने त्यांना तात्काळ वैदयकीय उपचार केल्यानंतर त्याचे पेट्रोल पंपावरील कामगार फिर्यादी नामे श्री. नवनाथ कचरु काळे वय-२६ वर्षे, यांची तक्रार नोंदणी करत असतानाच पोलीस अंमलदार आदेश चलवादी यांना तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे ३ अनोळखी आरोपींचा शोध गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउनि बडे व पथकाने घेतला असता त्यांची नावे निष्पन्न करुन आरोपी नामे १. सुरजितसिंग युवराजसिंग जुनी वय-२४ वर्षे, रा. पाटील इस्टेट, पुणे, २. जयसिंग जलसिंग जुनी वय-१९ वर्षे, रा. पाटील इस्टेट, पुणे, ३ शिवसिंग नसिबसिंग जुनी वय-१७ वर्षे, रा. हडपसर, पुणे यांना गुन्हयातील मोटारसायकलसह ताब्यात घेवून चौकशी केली असता सदरचा प्रकार हा पेट्रोल पंपावर दरोडा नसुन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे कारणावरुन मारहाण केल्याचे उघड झाले. त्याप्रमाणे फिर्यादीचे तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.क्र.५२/२०२४ भादवि कलम ४५२,३२४,४२७,३४ सह मो.वा.का. कलम १२८ (१), १९४ (सी) ३(१)/१८१ अन्वये गुन्हा नोंद करुन अनु.क्र.१ व २ यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील हत्यार हस्तगत करण्यात आले असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनि तेजस्वी पाटील हया करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. वसंत कुवर, सपोआ विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. चंद्रशेखर सावंत, सपोनि बाजीराव नाईक प्रपोनि (गुन्हे) सपोनि सविता सपकाळे, पोउपनि अजित बडे, पोलीस अंमलदार मिवरे, सय्यद, रुपेश वाघमारे, साठे, पवार, मेंगडे, कैंगले, वाघ, निकाळजे, शितोळे, धावडे, घडस, तायडे, चलवादी यांनी केली आहे.

