"लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलीसांनी केले अटक"

0 झुंजार झेप न्युज

• लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावुन

• देण्याच्या आमिषाने पैसे घेवुन बनावट अपोंयमेन्ट लेटर देवुन फसवणुक करणा-या गणेश बाबूलाल परदेशी

ठाणे,दि.10: याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बड्या अधिका-याशी ओळख असल्याचे सांगुण लष्करात सिव्हिलियन यापदावर नोकरीला लावतो म्हणुन ८.३२,०००/-रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो ठाणे येथे गुरन.११८९/२०२४, भा.दं.वि. कलम.४०६,४२०,४६४(अ),४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलेले होते. सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत कोंढवा तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक व त्याचे पथक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि.०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन.आय. बी. एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे ओळख लपवुन तोडाला रुमाला बांधुन सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफसह एन.आय.बी.एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर जवळ गेलो असता गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन चालला होता. त्याच्याकडे बातमीदाराने अंगुली निर्देश करुन सुचित केले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता गणेश बाबुलाल परदेशी राहणार कृष्ण केवल सोसायटी, एन आय बी एम रोड कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास वैभव सोनवणे सहा पोलीस निरीक्षक हे करित आहे.

वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो परि.०५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो.नि. पो. हवा. अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो.शि.अभिजीत रत्नपारखी, पो शि शशांक खाडे पो.शि. विकास मरगळे, पो.शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो. शि. जयदेव भोसले, पो.शि. अभिजीत जाधव, पो.शि. आशिष गरुड, पो.शि. रोहित पाटील, पो शि अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.