शैक्षणिक अभ्यास सहलीत जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथील सोमनाथ वाघ याची निवड
पैठण,दि.08: पैठण तालुक्यातील जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथील इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थीं सोमनाथ ज्ञानेश्वर वाघ यास समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत राज्या बाहेरील शैक्षणिक अभ्यास सहलीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे,दि.6-3-2024 ते दि.:10-3-2024 या कालावधीत खाजगी ट्रॅव्हल्सने अहमदाबाद स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथील शैक्षणिक व ऐतिहासिक भेटी देण्यासाठी अयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी जाणाऱ्या जिल्ह्य़ातील 40 विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.
अविष्कार अभियान अंतर्गत प्रगत झालेल्या शाळा व अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम असलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना समग्र शिक्षाच अभियान यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.समग्रशिक्षा अभियानांतर्गत जि.प.छञपती संभाजीनगर, औरंगाबाद,शिक्षण अधिकारी, प्राथमिक-जयश्री चव्हाण मॅडम, यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. राज्या बाहेरील भाषा विचार याची देवान घेवाण होते,सांस्कृतिक जाणिवा विकसीत होतात,विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी होते यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ही योजना जि.प राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे.
यामध्ये पैठण तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांमध्ये सोमनाथ वाघ याचा समावेश झाल्याने प्रशालेच्या वतीने त्याला रोख बक्षीस व आई वडीलासह त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक-अंकुश गाढे, ताराचंद हिवराळे,समशेर पठाण, राजेश पाखरे,दिलीप तांगडे, वैशाली कुटे,ज्योती बलखंडे,शेख फैय्याज उपस्थित होते.

