भाजप आमदार महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांना जिवे मारण्याची धमकी
पिंपरी चिंचवड,दि.10: पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या वतीने चिखली येथील सोनवणे वस्ती १/९६ टाऊन हॉल उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी मी सचिन काळभोर चिटणीस भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर निगडी येथील सेक्टर 22 जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल प्रकल्प स्थगिती आदेश उठवण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य दरवाजा ह्या ठिकाणी आमदार महेश लांडगे ह्यांनी मला पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या समोर जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच सदर कार्यक्रम स्थळा वून हाकलून दिले तसेच माझ्या विरोधात कट कारस्थान करतो म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्या नंतर चिखली पोलिस कर्मचारी ह्यांना मला आमदार महेश लांडगे व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते ह्यांच्या तावडीतून सुटका करून पोलिस संरक्षणात निगडी ह्या ठिकाणी सोडून देण्यात आले. चिखली पोलिस कर्मचारी ह्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आमदार महेश लांडगे व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते ह्यांच्या तावडीतून माझी सुटका केली नाही तर मला कार्यक्रम स्थळी जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असता भविष्यात मला आमदार महेश किसन लांडगे कार्तिक किसन लांडगे सचिन किसन लांडगे तसेच महेश लांडगे समर्थक कार्यकर्ते ह्यांच्या पासून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून गेल्या वर्षी इंद्रायणी थंडी कार्यक्रम आमदार महेश लांडगे ह्यांनी गाव जत्रा मैदान भोसरी या ठिकाणी भरविण्यात आला होता.
त्या वेळी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने माझ्यावर वैयक्तिक खुन्नस ठेऊन आमदार महेश लांडगे ह्यांनी मला चिखली येथील उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम प्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्ते ह्यांनी मला शिवीगाळ करून गराडा घातला होता त्या वेळी चिखली पोलिस कर्मचारी ह्यांनी माझे प्राण वाचवले म्हणून मी जीवंत असून येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या असून महेश लांडगे व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते ह्यांच्या पासून माझ्या जीवाला तसेच कुटुंबियांना जिवितास धोका निर्माण झाला असून मला पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर ह्यांच्या कडून पोलिस संरक्षण देण्यात यावे तसेच आमदार महेश लांडगे ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
व्हिडिओ पाहा :

