• महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करून साजरा केला महिला दिन
पिंपरी चिंचवड,दि.10: जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरांमधील महिलांनी शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळ्यांचे स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करून पूजन केले. अनेक वेळा महिला दिन केक कापून, वेगवेगळ्या पुरस्कार देऊन साजरा केला जातो. मात्र विकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही घर स्वच्छ ठेवू शकतो तर देश देखील स्वच्छ ठेवण्यासाठी अग्रेसर आहोत आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हाच संदेश आज महिलांनी लोकांमध्ये पोहोचवला आहे महापुरुषांचे पुतळे हे आपल्यासाठी प्रेरणा देणारे महत्त्वाचे विचार आहेत ज्या महिला 24 तास अविरत आपल्या देशासाठी झटत असतात.
अशा महिला पोलिसांचा सत्कार महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला कार्यक्रमा प्रसंगी ज्योतीताई निंबाळकर महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आणि अनिताताई तुतारे शिवसेना शहर संघटिका, ज्योतीताई भालके शहर उपसंगटिका व भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, कलावती नाटेकर, रेखा मोरे, संगीता अवधूते, अलका कांबळे, कविता देवकर, दिपाली पारखे, योगिनी मोहन, उषा आल्हाट, चिंचवड विधानसभा प्रमुख डॉ.वैशाली कुलथे, तसलीम शेखताई, चौरे काकू मीनल दळवी हर्षाली घरटे, समृद्धी निंबाळकर या पदाधिकारी उपस्थित होत्या.

