महाराष्ट्र भटक्या आत्म्याचा शिकार झालेले राज्य; नाव न घेता पीएम मोदींचा शरद पवारांवर निशाणा
पुणे,दि.30: भटकती आत्मा नक्की कोण? काल पुण्याच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तीन मिनिटे भटकती आत्मा या गोष्टीचा अनेक वेळा उल्लेख केला. ही भटकती आत्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून शरद पवार आहेत. पवारांनी नेहमी इतरांची सरकारे अस्थिर करून आपली पोळी भाजून घेण्याच्या उचापती केल्या. कसेही करून सत्तेत यायचे आणि कोणाचाही कसलाही विकास होऊ द्यायचा नाही आणि दुसरी कोणाची सत्ता आली तर ते सरकार अस्थिर करून पाडापाडी करायची आणि विकास कामे हाणून पडायची एवढाच खेळ नेहमी ही भटकती आत्मा करत आली. यामुळच भोर वेल्हा मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यातील लोक अजूनही विकासापासून वंचित आहेत. या सर्व तालुक्यात कोणाही शहाण्या माणसाला आमदार होऊ द्यायचे आणि झाला तर मंत्री होऊ द्यायचे नाही मंत्री झाला तर निधी उपलब्ध होऊ द्यायचा नाही आणि निधी उपलब्ध झाला तर अंमलबजावणीत टाळाटाळ करून त्या सरकारची मुदत संपली की तो प्रोजेक्ट आपोआप गुंडाळला जाईल अशीच कुरघोडी पवार यांनी नेहमी केली.
दादा जाधवराव यांनी पुरंदर तालुक्यात पाण्याची योजना अंमलात आणणार दुष्काळ हटणार अस लक्षात येताच या दुष्ट माणसाने मंत्री झालेल्या दादा जाधवराव यांना पाडले अशोक टेकवडे यांना आमदार केले ते काही योजना करू लागताच त्यांना पाडले विजय शिवतारे यांना आणले. जाहीर सभेला आले काँगेस च्या सभेला आणि म्हणाले विजय आपलाच आहे. अस म्हणून अनेक वेळा उभा राहिलेला संजय जगताप यांना पाडले. चंदू काका जगताप यांना कधीही सत्तेत येऊ दिले नाही की राहू दिले नाही. नंतर विजय शिवतारे स्थिर होतायेत आणि गुंजवणी नदी चे पाणी पुरंदर ला येण्यासाठी जवळपास दोन हजार कोटींची योजना अंमलात आणणार हे लक्षात येताच पवारांनी विजय शिवतारे यांना पण पाडले.बस अशीच पाडापाडी फोडाफोडी कुरघोडी करत पवार या भटकती आत्मा ने पुरंदर चे पूर्ण वाटोळं केलं. हीच दुष्ट प्रवृत्ती या भटकती आत्मा ने दौंड इंदापूर भोर येथे पण वापरली. याचा सर्वात मोठा फटाका लोकनेते अनंतराव थोपटे यांना पर्यायाने भोर च्या जनतेला बसला. अनंतराव थोपटे मुख्यमंत्री होणार असे दिसताच त्याच निवडणुकीत त्यांनी खुट्वड या माणसाला उभे करून पाडले. अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते तर भोर वेल्हा मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहिली अस्ती. या भटकती आत्मा ने आयुष्भर असेच प्रकार सुभाष कुल , हर्शवर्धन पाटील यांच्या सोबत केले. हेच प्रयोग जिल्हा परिषद पंचायत समिती यात केले
दिल्लीतून विकासाच्या योजना या मतदार संघात येऊ नयेत म्हणून खासदारकी कायम आपल्याच घरात ठेवली. स्वतः काहीच केले नाही मग मुलीला खासदार केले तिने एकवीस वर्षात याच भटकती आत्मा चे धोरण पुढे नेण्यासाठी सतत काम केले. एकही विकास योजना भोर वेल्हा मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यात आणली नाही.उलट तीनशे साठ कोटींचा निधी केंद्राला परत पाठवला पण कोणतेही विकास काम केले नाही. या भटकती आत्मा ला बाटली बंद करून हे भूत नागरिकाच्या मानगुटीवरून उतरवण्याची एकमेव संधी तीही पन्नास वर्षांनी भोर वेल्हा मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यातील जनतेला प्रथमच मिळाली आहे. कसेही करून सत्ता आपल्याच घरात राहावी म्हणून नाराजी झाकली जावी म्हणून उभे केले आहेत. कोण्ही जिंकला तरी सत्ता आपल्याच घरात. तेव्हा आता भोर वेल्हा मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर च्या लोकांनी हा डाव ओळखला आहे. एकाच बिळातून दोन साप बाहेर कादून एक तरी लोकांच्या हातून वाचेल आणि मग पुन्हा डसत राहता येईल अशीच ही दुष्ट प्रवृत्ती भटकती आत्मा ची योजना आहे. तेव्हा सुज्ञ जनतेने या दोन्ही पवारांना एकदाच पाडा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा. प्रा नामदेवराव जाधव नावाचा राजमाता जिजाऊ यांचा वारसदार कोणत्याही राजकारणात नसताना केवळ या सर्व सामान्य जनतेच्या मदतीला अचानक धाऊन आला आहे. कामाचा कोण तर फक्त टेलिफोन असे संगत त्यांनी टेलिफोन हे चिन्ह घेऊन उभे आहेत. क्रमांक अठरा. कारण हे महाभारतातील युद्ध आहे अठरा दिवस चालणार अठरा अक्ष हौनी सैन्य संपवणार आणि अठरा अध्यायाची गीता गोंधळलेल्या अर्जुनाला सांगून जगाला प्रगतीचा समृद्धीचा मार्ग दाखवणारे. तेव्हा जर आता काही भूलथापा आमिष यांना भाळून परत जर एकाही पवारला निवडून आणणार तर पुढील पाच पिढ्या बोंबलत बसाल. ते चुकलो असे म्हणतील माफ करा असे म्हणतील खोटी आश्वासने देऊन गाफील ठेवतील असे काही झाले आपण फसलो तर संपलो आपल्या पाच पिढ्या बरबाद झाल्याचं म्हणून समजा. म्हणूनच सर्व पक्ष कार्यकर्ते यांना आमची विनंती आहे की जनतेच्या रखडल्येल्या विकासा साठी या निवडणुकीत पक्ष पार्टी थोड लांब ठेवा मान पक्षाला मत आपक्षाला हे धोरण राबवा. टेलिफोन हेच चिन्ह निवडा. मूळ भोर आणि जन्मगाव पुरंदर असणारे राजमाता जिजाऊ यांचे वारसदार हेच खासदार करण हीच आपली स्वराज्य निर्मिती ची सुरुवात ठरेल. गेल्या पन्नास वर्षांत जी विकास कामे मार्गी लागली नाहीत ती मार्गी लावण्यासाठी आपल्याकडे हाच एक उत्तम पर्याय नियतीने दिला आहे.पुढील पिढीसाठी लक्षात ठेवा कामाचा कोण तर फक्त टेलिफोन. बदला अटळ आहे बदल अटळ आहे. भाकरी फिरवा.

