साहित्यिक इंजि.राजेंद्र घावटे लिखित "चैतन्याचा जागर" ला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

0 झुंजार झेप न्युज

साहित्यिक इंजि.राजेंद्र घावटे लिखित "चैतन्याचा जागर" ला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

संभाजीनगर,चिंचवड,दि.19: पिंपरी चिंचवड चे साहित्यिक मा.राजेंद्र घावटे यांनी लिहिलेल्या "चैतन्याचा जागर" या पुस्तकास येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा "राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार" जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण चार जून रोजी शिर्डी येथे होणार आहे. राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्कारांचे निकाल महाराष्ट्र व कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ व संपादक प्रशांत वाघ यांनी कळविले आहे.

शिवाबाबावाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या.  

प्राप्त कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एका कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

ललित लेखनासाठी पिंपरी चिंचवडचे लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या ललित लेख संग्रहाला पुरस्कार मिळाला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी याचे परिक्षण केले आहे. 

"चैतन्याचा जागर" या विचारसंग्रह ग्रंथाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक वै. डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रस्तावना तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा शुभसंदेश लाभला आहे. संवेदना प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले आहे.स्थानिक साहित्यिक संस्थांनी याबद्दल श्री. घावटे यांचे अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.