शेवगाव तहसील कार्यालयाचा गलथान कारभार
शेवगाव,दि.19: शनिवार दि १८-५-२०२४ रोजीची घटना भातकुडगाव येथील एका गरीब कुटुंबातील शेतकरी मोलमजुरी करिता बाहेर गेले असता त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून मुरम,माती ढंपरमध्ये भरून दिवसाढवळ्या चोरून नेतांना अचानक शेतात आलेल्या शेतकर्यांने पकडले व पकडुन जागेवर थांबवून मा तहसीलदार यांना फोन करून सविस्तर माहिती दिली परंतु या बाबत तहसीलदार यांनी कोणतीही दखल न घेतल्याने जेसीबी व ढपंरधारकांनी पलायन केले हताश शेतकरी कुणाकडे तक्रार करावी या बाबत चिंतेत आहे.
या बाबत शेतकरी वरील पुराव्यानिशी अहमदनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार आहे पीडित शेतकऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्याशी संपर्क करून संपूर्ण माहिती दिली आहे आगोदर ही अशा अनेक घटना घडल्या आहेत या मुरुम,माती, वाळू तस्करांना कोण पाठीशी घालतय याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे असा इशारा वंचित चे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी तहसीलदार शेवगाव यांना दिला आहे.

