आमदार महेश लांडगे यांच्याकडून 37 ठिकाणी मास मटन आखाडा पार्टी जेवण ठेवण्यात आले असून त्यासंदर्भात चौकशी करण्यात यावी : सचिन काळभोर

0 झुंजार झेप न्युज

आमदार महेश लांडगे यांच्याकडून 37 ठिकाणी मास मटन आखाडा पार्टी जेवण ठेवण्यात आले असून त्यासंदर्भात चौकशी करण्यात यावी : सचिन काळभोर 

पिंपरी चिंचवड,दि.20: भोसरी विधानसभा मतदारसंघ आमदार महेश लांडगे ह्यांच्या कडून ३८ ठिकाणी मांस मटण आखाड पार्टी जेवण ठेवण्यात आले असून त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी करोडो रुपये खर्च करून भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी आखाड पार्टी जेवण ठेवण्यात आले असून त्या मुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी आमदार महेश लांडगे चर्चेचा विषय ठरले असून करोडो रुपये खर्च करून जेवणाचा बेत आखला असून मतदार संघातील विकास कामे संथ गतीने सुरू असून निगडी भागातील पी सी एम सी कॉलनी इमारत जीर्ण अवस्थेत असून इमारत धोकादायक झाली असून ७७४ कुटुंब पी सी एम सी कॉलनी येथील धोकादायक इमारती मध्ये वास्तव्य करत असून ५० वर्ष जास्त कालावधी झाला असून पुनर्वसन होतं नाही तर दुसरीकडे निगडी येथील सेक्टर २२ जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत संपूर्ण झाल्या असून त्या ठिकाणी ९२० पात्र लाभार्थी ह्यांना घरकुल इमारत मधील घर मिळत नाही गेल्या १४ वर्ष निगडी येथील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माझी नगरसेविका ह्यांनी जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत बांधकाम संदभात मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश घेतला होता त्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्यांनी स्थगिती आदेश उठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली नाही किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला नाही तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी रुपी नगर तळवडे चिखली पाटील नगर टावर लाईन ज्योतीबा नगर तसेच इतर भागातील रेड झोन प्रश्न सुटला नाही तसेच इतर छोटे मोठे रस्ते काँक्रिट रखडले आहे.

पेव हिंग ब्लॉग तुटलेल्या अवस्थेत असून रस्त्यावर चालणें मुश्किल झाले आहे घर खरेदी विक्री व्यवहार रेड झोन मुळे होत नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळा मुळ जागा स्थलांतर करण्यात आली असून करोडो रुपये खर्च वाया गेला आहे रुग्णालय पुरेसा सुविधा उपलब्ध होत नाही डॉ हलगर्जीपणा करत आहे सरकारी रुग्णालयात लक्ष देत नाही त्यामुळे छोटं मोठं अपघात होत आहेत तर दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सालाबादप्रमाणे आमदार महेश लांडगे ह्यांनी करोडो रुपये खर्च करून मटण खाण्याची आखाड पार्टी जेवण ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून मतदार ह्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त तसेच सक्त वसुली सचनालय तथा इडी. इन्कम टॅक्स विभाग ह्यांनी ह्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्याची आखाड पार्टी जेवण करोडो रुपये खर्च चौकशी करण्यात यावी हि नम्र विनंती सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.