खडक पोलीसांची अवैध गुटखा साठ्यावर कारवाई करून एकूण १०,२१,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.

0 झुंजार झेप न्युज

खडक पोलीसांची अवैध गुटखा साठ्यावर कारवाई करून एकूण १०,२१,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.

पुणे,19: खडक पोलीस स्टेशनमध्ये नुकताच कार्यभार स्वीकारलेले मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष खेतमाळस यांनी स्वाकारलेले आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदयाचे अनुषंगाने ऑपरेशन ऑल-आऊट व ऑपरेशन वॉश-आऊट राबविण्यासाठी त्यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक १३/०७/२०२४ रोजी लोहियानगर परिसर व काशेवाडी परिसर येथील भागात मटका, जुगार, अवैध गुटखा, दारुचे धंदे याबाबत माहिती घेण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काइंगडे यांना त्यांचे गुप्त बातमीदराकडून बातमी मिळाली की, विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी टेम्पो क्र.१) MH- 12 JF1277 २) MH-12 LT 2620 यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु या मालाची एक इसम टेम्पोमध्ये विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली आहे. अशी बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांनी खडक पोलीस स्टेशनकडील मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संतोष खेतमाळस व तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार २८४२ दुडम, पो.शि. पोशि ९१०२ वाबळे, पोशि ८९३८ ढावरे असे रवाना केले. अशा गुटख्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात येवुन त्याच्या शरीरावर विपरीत परीणाम होत असल्याने त्यानुसार प्रल्हाद डोंगळे व त्यांच्या टिम रवाना होवून त्यांनी त्यांची वाहने एका विशिष्ट अंतरावरती लावुन येथे जावुन एक इसम विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी टेम्पो क्र.१) MH-12 JF1277 2) MH-12 LT 2620 या वाहनांमध्ये माल ठेवुन टेम्पोला लॉक लावत असताना मिळून आला.

 त्यातील एकूण ४,०१,५००/- रुपये किंमतीचे दोन पेंगो कंपनीचे टेम्पो व ६,१९,७००/- रुपये किंमतीचे विमल पान मसाला प्रिमीयम राज निवास सुगंधित पान मसाला, प्रीमियम झेड एल०१ जाफरानी जर्दा, वी-१ तंम्बाकु असे प्रतिबंधीत गुटखा पान मसाला असे एकुण मिळुन १०,२१,२००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल प्रतिबंधीत पदार्थाची विक्री करीता साठवणूक करून मिळून आला. त्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशनला दिनांक १४/०७/२०२४ रोजी गुन्हा रजि. नं. २३८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३.२२३.२७४,२७५.३(५) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), ३१ (१), २६(२) (1) २६(२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयात गुटखाधारक चालक आरोपी नामे आकिब शकील शेख, वय ३२ वर्षे रा.५४ ए.पी. लोहीयानगर, पुणे यांचेविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी यांनी गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, व पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजून कोणाकडे अवैध गुटखा सुरू आहे सदर आरोपी याला मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला ०३ दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. सध्या आरोपी याला मा. कोर्टाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सध्या पाहिजे आरोपीचा शोध घेवून गुटख्याची पुढील चेन उध्दवस्त करण्याचे काम सुरू आहे. तरी याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

नमूद कारवाई श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्री. मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईगडे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष खेतमाळस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन ढावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले आशिष चव्हाण, इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.