⟩ गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी,दि.14: रत्नागिरी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधार टिळक जन्मस्थान सुशोभिकरण या विकास कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
यावेळी खासदार नारायण राणे, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

