सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी नियुक्तीस मंजुरी

0 झुंजार झेप न्युज

सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी नियुक्तीस मंजुरी 

पिंपरी चिंचवड,दि.10: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या पदावर उपआयुक्त पदी सीताराम बहुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून सीताराम बहुरे यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याच्या निर्णयास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. 

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणारे सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी पदोन्नती झाली असून ते सध्या फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.