- डोमासाईल प्रमाणपत्र मागणाऱ्यास जातिवाचक भाषा वापरल्याने तहसीलदारावर ॲट्रॉसिटी चे संकट
- जातीवाचक भाषा वापरल्याने धनाराम यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगात तक्रार केली.
पुणे,दि.04: डोमासाईल प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने, तसेच तहसीलदार यानी जातिवाचक भाषा वापरल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना संबंधित तहसीलदाराची चौकशी करण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणी संपूर्ण माहिती अशी की,पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे तक्रारदार यांनी तहसीलदार पिंपरी चिंचवड यांच्याकडे डोमासाईल दाखल्याची मागणी केली असता त्यांना तुम्ही दलित असून तुम्ही महाराष्ट्र बाहेरचे आहेत, त्यामुळे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट देता येत नाही असे कारण सांगत डोमासाईल दाखला देण्यास नकार दिला. तहसीलदारांनी अशी जातीवाचक भाषा वापरली व अपमान केला .
यानंतर तक्रारदार यांनी माझ्याकडे डोमासाईल प्रमाणपत्रासाठी जी कागदपत्रे लागतात ती सर्व कागदपत्रे आहेत तरी आपण माझा डोमासाईल सर्टिफिकेट का देत नाही असा प्रश्न विचारला असता तहसीलदारांनी बाहेर माझा एक माणूस आहे त्याला भेटा तो तुमचे काम करेल असे सांगितले, त्यानंतर धनाराम मांगलिया यांनी दुसऱ्या दिवशी तहसीलदार कार्यालयाबाहेर असलेला तहसीलदाराचा प्रज्ञेश नावाचा माणूस याची भेट घेतली, तहसीलदाराच्या या माणसाने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांची मागणी ,करत पैसे दिले तरच तुमचे डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाईल अन्यथा तुमचे डोमासाईल प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असे सांगितले.
मुळात तक्रारदार हे राजस्थान चे असून मागील 1993 पासून ते पुण्यामध्येच वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडे येथील रेशन कार्ड तसेच 2007 व 2011 या वर्षीचे दोन्ही खरेदी खत त्यांच्या नावे असून त्यांच्या मुलांचे शिक्षण औंध येथे झाले आहे, असे असून सुद्धा डोमासाईल प्रमाणपत्रासाठी तक्रारदार यांना तहसील कार्यालय वतीने पैशाची मागणी करून जातिवाचक भाषा वापरून अपमान केला त्रास दिला गेला, त्यामुळे तक्रारदार यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगात तक्रार दिली.
सर्व रीतच कागदपत्रे असतानाही डोमासाईल सर्टिफिकेट न मिळाल्याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांच्याकडे याबाबत तहसीलदारांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला हा तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहे.
तक्रारदारास जातिवाचक भाषा वापरल्याने तसेच डोमासाईल दाखला मिळविण्यासाठी पैशाची मागणी केल्याने तहसीलदारावर ॲट्रॉसिटी ची कारवाई चे संकट उभे ठाकले आहे.या सर्व प्रकरणात तक्रारदार यांना भीम आर्मी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष रहीम सय्यद यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे धनाराम मांगलिया यांना न्याय मिळेल अशी आशा वाटते

