दि.२३/०९/२०२४ निगडी पोलीस ठाणे तपास पथकाकडुन मोटार सायकल चोरी करणारे ०२ आरोपींना अटक, १७,५०,०००/- रुपये किंमतीच्या ३० मोटार सायकल जप्त, २७ गुन्हे उघड

0 झुंजार झेप न्युज

 दि.२३/०९/२०२४ निगडी पोलीस ठाणे तपास पथकाकडुन मोटार सायकल चोरी करणारे ०२ आरोपींना अटक, १७,५०,०००/- रुपये किंमतीच्या ३० मोटार सायकल जप्त, २७ गुन्हे उघड

पिंपरी चिंचवड,दि.23: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. पोलीस आयुक्त साो विनयकुमार चौबे साो यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालणे बाबत व गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

तेव्हा आम्ही निगडी पोलीस ठाणेकडील तपास पथकास या बाबत आदेशीत केले वरुन निगडी पोलीस ठाणे गुरनं. ४२४/२०२४ भादवि कलम-३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास श्री शत्रुघ्न माळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री निलेश वाघमारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) निगडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे श्री अंबरिष देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक व अंमलदार असे करत असताना सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपी गुन्हा करण्यासाठी येतानाचे व गुन्हा केल्यानंतर जातानाचे असे २५०-३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्या नंतर गुन्हा केलेल्या ०२ संशयीत आरोपीं बद्दल माहिती मिळाली.

तेव्हा सदर महितीच्या अनुषंघाने श्री अंबरिष देशमुख सपोनी यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणा वरुन पोहवा/दत्ता शिंदे, पोशि/सुनिल पवार, पोशि/प्रविण बांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथुन संशयीत आरोपी राम ऊर्फ कविराज ज्ञानोवा केंद्रे वय २८ वर्ष, धंदा काहीनाही, रा. खोकलेवाडी, पोस्ट सुपा ता. गंगाखेड जि. परभणी यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे कौशल्य पुर्वक तपास करुन, त्याने व त्याचा साथीदार आरोपी नामे अविनाश तुकाराम होळंबे वय २८ वर्ष, रा. खोकलेवाडी, पोस्ट सुपा ता. गंगाखेड जि. परभणी याचेसह मिळुन सदरचा व इतर अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा त्याने व त्याचा साथीदार अविनाश होळंबे यांनी चोरी केलेल्या काही मोटार सायकल या गावी नेण्यासाठी चिखली परीसरात एका पडीक जागेत लपवुन ठेवल्याचे निष्पन्न आल्याने सदर ठिकाणावरुन १५ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. तसेच काही मोटार सायकल या त्यांचे मुळ गावी व परीसरात विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे अविनाश होळंबे याचा शोध घेणे कामी व वाहने जप्त करणे कामी पोहवा/भगवान नागरगोजे, पोना/तुषार गेंगजे, पोशि/विनायक मराठे, दिपक पीसे असे पथक रवाना झाले असता आरोपी नामे अविनाश होळंबे यास ताब्यात घेऊन त्या दोघांनी चोरीचे वाहने विक्री केलेल्या दोन एंजटला ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ५ चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या. आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांचे मुळगाव परिसरात कळाल्याने अनेक लोकांनी विकत घेतलेल्या चोरीच्या १० मोटार सायकल या सदर आरोपर्षीच्या घरा बाहेर बेवारस आणून सोडल्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या असुन मोटार सायकल बेवारस सोडुन जाणा-या इसमांची नावे निष्पन्न झाली असुन त्यांचा शोध सुरु आहे.

सदर दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असुन, ते काही काळ चिखली परीसरात वास्तव्यास होते. दरम्यान त्यांचेकडे असलेल्या डुप्लीकेट चावीने ज्या मोटार सायकलला ती डुप्लीकेट चावी बसेल ती मोटार सायकल चोरी करुन त्या गाड्या निर्जनस्थळी लावुन मागणी प्रमाणे गावाकडे नेवुन विक्री करुन, पुन्हा पुण्यात येऊन फॅब्रिकेशनचे काम करत होते. तसेच गावी येताना जाताना लागणा-या भागातुन सुध्दा ते मोटार सायकल चोरी करत असे.

आरोपींकडुन खालील पोलीस ठाणे येथील एकुण-२७ गुन्हे उघड झालेले आहेत.

१) निगडी पोलीस ठाणे-४ गुन्हे


२) चिखली पोलीस ठाणे-४ गुन्हे


३) हिंजवडी पोलीस ठाणे-४ गुन्हे


४) पिंपरी पोलीस ठाणे- २ गुन्हे


५) वाकड पोलीस ठाणे -२ गुन्हे


६) आळंदी पोलीस ठाणे- १ गुन्हा


७) दिघी पोलीस ठाणे-१ गुन्हा


८) पुणेशहर चर्तुश्रृंगी पोलीस ठाणे-१ गुन्हा


९) पुणे ग्रामीण-रांजनगाव एमआयडीसी पो.ठाणे-१


१०) पुणे ग्रामीण-रांजनगाव पोलीस ठाणे-१ १२) लातुर-शिवाजीनगर पोलीस ठाणे-२ गुन्हे


११) पुणे ग्रामीण-हवेली पोलीस ठाणे-१ गुन्हा


१४) रायगड-खालापुर पोलीस ठाणे १ गुन्हा


१३) बिड- अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे-१ गुन्हा


१५) मिरा-भाईंदार- मिरारोड पोलीस ठाणे-१ गुन्हा

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे मा.श्री विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, श्री डॉ शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, श्रीमती स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त, परिंमडळ-१, श्री. मुकुटलाल पाटील सपोआ चिंचवड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शत्रुघ्न माळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी, श्री निलेश वाघमारे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री अंबरिष देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, तपास पथक. पोहवा/भगवान नागरगोजे, राहुल गायकवाड, सुधाकर अवताडे, सिद्राम बाबा, विनोद होणमाने, दत्तात्रय शिंदे, स्वप्नील पाचपांडे, पोना/तुषार गैंगजे, पोशि/विनायक मराठे, सुनिल पवार, दिपक पिसे, प्रविण बांबळे, केशव चेपटे, मपोना/नतुन कोंडे यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.