आजच्या दिवशी १९७८ साली मुकद्दर_का_सिकंदर चित्रपट प्रदर्शित झाला.

0 झुंजार झेप न्युज

आजच्या दिवशी १९७८ साली मुकद्दर_का_सिकंदर चित्रपट प्रदर्शित झाला.

मुंबई,दि.26: मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केलं होतं.या चित्रपटात अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्याशिवाय राखी, रेखा, रणजीत आणि अमजद खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट देवदास या बंगाली कादंबरीपासून प्रेरित होता. या चित्रपटाचे संवाद

कादर खान यांनी लिहीले होते.याचे संगीतकार कल्याणजी-आनंदजी होते. यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.मुंबईत अलंकार थिएटरला या चित्रपटाचा पन्नास आठवड्यांचा मुक्काम होता.

या चित्रपटातील एका फाईट सीनमध्ये विनोद खन्ना गंभीर जखमी झाले होते, त्यांना सोळा टाके पडले होते.असे म्हणतात अमिताभ बच्चन यांच्यामुळे विनोद खन्ना जखमी झाले होते.या घटनेनंतर विनोद खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यात कायमची दरी निर्माण झालीत. विनोद खन्ना या घटनेने इतके दुखावले होते की, त्यांनी अमिताभ यांच्यासोबत पुन्हा कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता.पुढे अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांनी या नंतर एकत्र काम केले नाही. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.