चिंचवड मतदारांची फेक कॉलवरून दिशाभूल

0 झुंजार झेप न्युज

  • पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
  • राहुल कलाटे समर्थकांकडून तक्रार


चिंचवड, ता. ४ : हॅलो..मी डॉ अमोल कोल्हे बोलतोय!, येत्या निवडणूकीत शंकर जगताप यांना मतदान करा असे आवाहन करणारा फेक फोन कॉल चिंचवडमधील मतदारांना येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे समर्थकांकडून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.      

फेक कॉल वरून लाखो रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार आपण ऐकला असेल पण, आता महायुतीच्या उमेदवारांकडून थेट मतदारांना स्टार प्रचाराकांच्या नावे फेक कॉल करून दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्रू कॉलरवरनाव येत असल्याने मतदार उत्सुकतेने तो कॉल घेत आहेत. मात्र, फोन घेताच महायुतीच्या शंकर जगताप यांना मतदान करण्याची विनंती ते करत आहेत.याबाबत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना आणि

समर्थकांना शंका आली त्यांनी याबाबत खातरजमा केली असता हा सर्व फेक कॉल आणि फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यलय गाठून याबाबत तक्रार दिली आहे.

प्रतिक्रिया : 

चिंचवडमधील भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्याकडून अमोल कोल्हेंच्या नावाचा वापर करून फेक कॉलद्वारे मतदारांची फसवणुक वदिशाभूल होत आहे. अमोल कोल्हेकडून भाजपचा प्रचार केला जात असल्याच भासवलं जात आहे. जनतेची दिशाभूल करनाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.

- रोहन जाधव

- राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कलाटे यांचे उमेदवार प्रतिनिधी


महाविकास आघाडीसमोर आपला पराभव अटळ असल्याचे जाणून आता भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. पराभव कमी फरकाने व्हावा म्हणून आता अशा फसवणूकीची केवीलवाणी कुबडी हाताशी धरली जात आहे. जनता याला भीक घालणार नाही महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

- राहुल कलाटे

उमेदवार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शारदचंद्र पवार पक्ष    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.