आमदार अमित गोरखे यांची भेट घेत ,युवा नेते पार्थ पवारांनी दाखविला राजकीय शिष्टाचार

0 झुंजार झेप न्युज

श्री अण्णा बनसोडे यांच्या साठी मोट बांधण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची त्यांनी भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती असणारी पकड सोबतच पिंपरी विधानसभेमधील सर्वच प्रभागांमध्ये असणारा दांडगा जनसंपर्क हा उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी लावून सर्वतोपरी अण्णा बनसोडे यांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे या भेटीदरम्यान पार्थ पवार हे म्हणाले.

पिंपरी मधील सध्याची परिस्थिती त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय काय केले पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे यावेळी अमित गोरखे यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान भाजपाचे राजेश पिल्ले ,अजित भालेराव, देवदत्त लांडे ,पंकज दलाल ,शाकीर भाई शेख,बादशाह इटकर , धरंम वाघमारे,धर्मेंद्र क्षीरसागर, गणेश लंगोटे जयेश चौधरी, राजू होसमणी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते..

आमदार यांच्या व्यतिरिक्त त्यांनी भाजपच्या अनेक नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.