अश्विनी जगताप यांच्या प्रचार दौऱ्यास थेरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 झुंजार झेप न्युज

शंकर जगताप लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; थेरगावकरांना विश्वास

चिंचवड,दि.11: लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ यांच्या पुढाकारातून आपण चिंचवडचा 'न भूतो न भविष्यती' असा विकास करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकले होते. शंकर जगताप हेदेखील लक्ष्मणभाऊ यांच्याप्रमाणेच विकासाचे स्मार्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या चिंचवड विधानसभेच्या स्मार्ट विकासासाठी स्मार्ट व्हिजन असणाऱ्या शंकर जगताप यांना साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाववासीयांना केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी थेरगाव येथील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.

यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेविका आरती चोंधे, भारती विनोदे, करिष्मा बारणे, सनी बारणे यांच्यासह थेरगाव परिसरातील महायुतीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्यात महायुतीच्या सरकारने अनेक विधायक निर्णय घेतले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करून महिला भगिनींना मदतीचा हात दिला. शेतकरी बांधव, युवा तरुण यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक योजना या सरकारने आणल्या. म्हणून आम्ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, असे सांगत थेरगाव परिसरातील मतदारांनी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे किमान लाखाच्या मताधिक्याने आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रचार दौऱ्यात गावकऱ्यांनी विकासाबाबत आपली अपेक्षा व्यक्त केली. 'परिसराच्या विकासासाठी शंकर जगताप यांना भरघोस मतदान करा' असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले. तसेच या परिसराचा अधिक वेगाने विकास आणि अधिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेचा भागीदार होण्याचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर केलेल्या चर्चेमुळे, अनेक ग्रामस्थांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्धार केला, ज्यामुळे थेरगाव परिसराच्या प्रगतीला नव्याने दिशा मिळणार आहे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.