महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ...
पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२५:- :आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी आम्ही सर्वजण निष्ठापूर्वक काम करू, आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, आम्ही कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही तसेच आम्ही सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू करू” अशी राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली.
भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन आणि शपथेचे वाचन केले.

