शरदचंद्र पवार साहेबांची RPI (आंबेडकर) पदाधिकाऱ्यांसोबत भेट
मुंबई,२४ नोव्हेंबर २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची आज RPI (आंबेडकर) चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री भूपेश थूलकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने भेट घेतली.
या प्रतिनिधीमंडळात—
राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील,महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री बालासाहेब पवार,महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री दादासाहेब ओव्हाळ,तसेच महाराष्ट्र संघटक श्री कैलास जोगदंड — यांचा समावेश होता.
या भेटीत देशातील वाढत्या धर्मांध आणि जातीयवादी प्रवृत्तींच्या विरोधात दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
तसेच आगामी महाराष्ट्रातील सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा मुद्दाही या बैठकीत प्रमुखतााने मांडण्यात आला.

