पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर केला सादर

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर केला सादर


पिंपरी२८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचेकडे सादर केले. हे अंदाजपत्रक मूळ ५ हजार ६६० कोटी ७३ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) रूपयांचे तर केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ३२२ कोटी १७ लाख रूपयांचे असल्याचे यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजरमनिषा चिंचवडेसंदीप कस्पटेसारीका गायकवाडयोगिता नागरगोजेकृष्णा सुरकुलेशीतल वर्नेकरअर्चना कारंडेमधुरा शिंदेबाबासाहेब त्रिभुवनसविता आसवानीसंतोष कोकणेसंदीप वाघेरेविकास सानेसुलभा उबाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोरविक्रांत बगाडेमुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रविणकुमार जैनमुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसलेनगरसचिव मुकेश कोळपशहर अभियंता मकरंद निकमआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणेयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळेमुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसंजय कुलकर्णीअतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवारसह शहर अभियंता अजय सुर्यवंशीमनोज सेठियाउप आयुक्त संदीप खोतडॉ. प्रदीप ठेंगलसचिन पवारममता शिंदेराजेश आगळेव्यंकटेश दुर्वासपंकज पाटीलमुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणालेयावर्षी अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग उपक्रमाद्वारे महापालिकेस मागील वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे ४ हजार ९९६ सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांमधील २९७ सूचनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.  नागरिकांच्या या सूचना शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६ हजार २५६ कोटी ३९ लाख (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईलहे अपेक्षित धरून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे प्रशासक यांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभेमार्फत महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५ हजार ६६० कोटी ७३ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च ५ हजार ६५५ कोटी ७३ लाख होईल व मार्च २०२७ अखेर ५ कोटी इतकी शिल्लक राहीलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

...............

क्षेत्रीय स्तरावर विकास कामांसाठी करण्यात आलेली तरतूद -

महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अग आणि ह क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अनुक्रमे ६ कोटी २९ लाख११ कोटी ४९ लाख१० कोटी २५ लाख११ कोटी ४४ लाख३ कोटी ७० लाख९ कोटी ३० लाख५ कोटी २८ लाख७ कोटी ९२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. 

...........

अर्थसंकल्पाची खास वैशिष्ट्ये -

·      महापालिकेच्या विकासकामांसाठी एकूण १ हजार १८६ कोटी रुपयांची तरतूद

·      स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षाअंतर्गत ४३६.९४ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित

·      महापौर निधीसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद

·      शहरी गरीबांसाठी (बीएसयुपी) अंदाजपत्रकात १ हजार ९५३ कोटी रुपयांची तरतूद

·      जेंडर बजेट – महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव ९९ कोटी रुपयांची तरतूद

·      दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत ६८ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद

·      पाणीपुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता १५५ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद

·      पी. एम. पी. एम. एल. करीता अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांची तरतूद

·      भूसंपादनाकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद

·      अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरिता १० कोटी रुपयांची तरतूद

·      स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद

·      अमृत २.० योजनेसाठी ५४ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद

...........

चालू विकासकामेप्रस्तावित प्रकल्प आणि उपक्रम –

 नवीन प्रशासकीय इमारतपिंपरी येथील डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूलमोशी रुग्णालयथेरगाव येथील पीपीपी कर्करोग रुग्णालयअग्निशमन प्रबोधिनी इमारतप्रभाग क्र. १६ मधील मामुर्डी ते सांगवडे / हिंजवडी पुल बांधकाम प्रकल्पड्रेनेज मास्टर प्लॅनपीसीएमसी सिटी सेंटरअण्णासाहेब मगर स्टेडियमहरित सेतू आणि टेल्को रोड – एनएमटी प्रकल्पपाणीपुरवठा सुधारणा प्रकल्प (भामा आसखेड जॅकवेल – अमृत २.० अंतर्गत)प्रधानमंत्री आवास योजना (चऱ्होलीडुडुळगांवबोऱ्हाडेवाडीपिंपरीआकुर्डी)अ प्रभागातील मदनलाला धिंग्रा मैदानात नवीन क्रीडा संकुलवाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टतळवडे येथील सर्व्हे नं. १ गायरान जागेवर बायोडायव्हर्सिटी पार्कविविध ठिकाणी वेस्ट टू वंडर (टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ) कलाकृती निर्मिती,  मुळा नदी पुनराज्जीवन प्रकल्पइंद्रायणी नदी पुनराज्जीवन प्रकल्पमोशी कचरा डेपोमोशी कचरा डेपो येथील बायोगॅस प्रक्रिया प्रकल्पसांडपाण्याचे पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर प्रकल्पएकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पजल ही अमृत उपक्रमसामाजिक उपक्रम (सखी आंगण)प्राथमिक शिक्षण विभाग (जल्लोष शिक्षणाचा पर्व ३शालेय साहित्य खरेदीभारत दर्शन यात्राकाला घोडा महोत्सवात सहभागी शाळांना बक्षिसेसी लर्निंग अंतर्गत निवडक शिक्षकपर्यवेक्षक व अधिकारी यांना प्रशिक्षणाकरिता लडाख येथे शैक्षणिक भेट).

...........

विभागनिहाय अंदाजपत्रक विकास कामांसाठी भांडवली खर्च पुढीलप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात विकास कामांसाठी भांडवली खर्चांतर्गत स्थापत्य विभागासाठी ७२७ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूसंपादनासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विद्युत विभागासाठी ३२ कोटी ७८ लाख रुपयेपाणीपुरवठा विभागासाठी १५५ कोटी ७३ लाख रुपये तसेच जलनि:सारण विभागासाठी १८ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण विभागासाठी २४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून ‘प’ अंदाजपत्रकांतर्गत विविध विकास कामांसाठी ३४ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन २०२६–२७ चा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाचा ठोस आराखडा आहे. विकास कामांसाठी १ हजार १८६ कोटी रुपयांची तरतूदस्थापत्य विभागासाठी ७२७ कोटी ९२ लाख रुपयांचा भांडवली खर्चपाणीपुरवठाभूसंपादनपर्यावरण आणि पायाभूत सुविधांसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे शहराच्या दीर्घकालीन गरजांना गती मिळणार आहे. नागरिकांच्या सहभाग उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या सूचनांपैकी लक्षणीय सूचनांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आल्याने हे लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाचे प्रतीक आहे. शहरी गरीबमहिलांसाठी जेंडर बजेटदिव्यांग कल्याणकारी योजनातसेच स्मार्ट सिटीअमृत २.० आणि पीएमपीएमएलसाठी केलेली तरतूद ही सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेली ठोस पावले आहेत. प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर अधिक सक्षमसुजाण आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होईलअसा विश्वास आहेअसे आयुक्त हर्डीकर यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.