पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड...

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड...

पिंपरीदि. २८ फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सदर विशेष सभेत स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

     स्थायी समिती सभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली असता अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. इतर कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अभिषेक बारणे यांची स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी एम.जे.प्रदीप चंद्रन यांनी जाहीर केले.

     निवडणूक कार्यालयास आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोरविक्रांत बगाडेनगरसचिव मुकेश कोळप,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविणकुमार जैनमुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसलेविशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच  महापालिका विविध विभागप्रमुख उपस्थित होते,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

   या निवडीनंतर महापौर रवि लांडगेसत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरउपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह नगरसदस्य व नगरसदस्या यांनी सभापती अभिषेक बारणे यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.