सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
पैठण : जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथे उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले शेख फैय्याज आज सेवानिवृत्त झाले.त्यांचा जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण च्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रशालेच्या वतीने व विविध शिक्षक संघटनेच्या वतीने शेख फैयाज यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख,प्रकाश लोखंडे,पैठण नंबर02 केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर, नगरसेवक हसनोद्दीन कटयारे, कन्या प्रशालेचे मु.अ.सुरेश झारगड,मा.नगरसेवक इनाम अन्सारी,शेख फैय्याज यांचे बंधू व नातलग,या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
शेख फैय्याज यांनी केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड येथे 2 वर्ष,केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवाडी येथे 2वर्ष,केंद्रीय प्राथमिक शाळा पैठण नंबर02 येथे 16 वर्ष व जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे माध्यमिक शिक्षक म्हणून 21 वर्षे सेवा केली. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून इतरही शिक्षकांची भरपूर कामे केली.एक दिव्यांग व्यक्ती असून स्वतःला कधी दिव्यांग न माणता कोणतीही सवलत न घेता शाळेसाठी नियमित काम करत राहिले शाळेचे व स्वतःचे नाव लौकिक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख समशेर पठाण व दिलीप तांगडे यांनी केले.तर उपस्थितीतांचे आभार ताराचंद हिवराळे यांनी मानले.
या वेळी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष योगेश शिसोदे, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन गणपत मिटकर,मा. केंद्रप्रमुख वसंत ताकटे, मुख्याध्यापक दिलीप थोटे, विठ्ठल नरके,भगवान वाघमोडे, प्रकाश भवर,कैलास वाकडे, बाळासाहेब पाखरे,जुनी पेन्शन शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष विष्णू भिंगारे,शिक्षक भारती तालुका अध्यक्ष बाबासाहेब येळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे,शिक्षक पतसंस्था पैठण संचालिका अमृता भुमरे,शिक्षक सेनेचे सरचिटणीस लक्ष्मण गलांडे, पैठण तालुक्यातील केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक,शिक्षक बंधू भगिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
