उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ ठरेल – महापौर रवि लांडगे

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन

 

 

पिंपरीदि. 10 मे २०२६ :  पिंपरी चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा श्वास आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात अधिक उद्याने असूनत्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र येण्यासाठीव्यायामसांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहेअसे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यान परिसरात बहुउद्देशीय दोन मजली विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबरनगरसदस्य कुशाग्र कदमतुषार हिंगेअनुराधा गोरखेसुप्रिया चांदगुडेउपायुक्त अण्णा बोदडेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकसामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

महापौर रवि लांडगे म्हणाले कीपिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांचे आधुनिकीकरण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

कापसे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या दोन मजली विरंगुळा केंद्रासाठी ६ लाख ५३ हजार रुपये खर्च येणार असून या कामाची मुदत ८ महिन्यांची आहे.विरंगुळा केंद्र १८ मीटर बाय ८ मीटर असे एकूण २८८ चौरस मीटर परिसरात असणार आहेअशी माहिती यावेळी देण्यात आलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.