केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,भारत सरकार श्री. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न.

0 झुंजार झेप न्युज

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,भारत सरकार श्री. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न.

पुणे, दि. ३० जुलै २०२६ : देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील रस्ते स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
दौऱ्याच्या मार्गावरील तसेच संबंधित परिसरातील स्वच्छता व नागरी सुविधांची कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मा.महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, नाले व ड्रेनेजची प्रभावीपणे सफाई करणे, अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे तसेच अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता, वाहतूक सुरळीतता, रस्त्यांची स्थिती आणि आवश्यक नागरी सुविधा याबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीस मा.सभागृह नेते श्री गणेश बिडकर, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल ) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष.) श्री.ओमप्रकाश दिवटे तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध विभागांचे उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.