स्थायी समितीच्या सभेत पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व आपत्कालीन सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

0 झुंजार झेप न्युज

स्थायी समितीच्या सभेत पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधाआपत्कालीन सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी चिंचवड,दि06: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागरिकांच्या दैनंदिन सेवांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता देण्यात आली.

पशुवैद्यकीय सेवा अखंडित ठेवणे, क्रीडा सुविधाखेळाडूंना प्रोत्साहन, शहरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती, आपत्कालीन व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता सेच शैक्षणिकआरोग्य क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर यावेळी निर्णय घेण्यात आले.

सभेत पशुरुग्णालयातील पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरावेट कर्मचारीइतर आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याच्या सेवेला नवी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा, प्राणिसंग्रहालयातील सेवा तसेच भटक्या प्राण्यांशी संबंधित अत्यावश्यक सेवा अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे. 

महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक फर्निचरसाहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील रस्ते, बीआरटी रेलिंग, फुटपाथ दुरुस्ती आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वार्षिक परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांच्या संचालनदेखभालीसाठी वश्यक कार्यवाहीस मंजुरी देण्या आली.


वायसीएम रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीस नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सार्वजनिक शौचालयेमुताऱ्यांची यांत्रि पद्धतीने साफसफाई आणि देखभालीच्या कामास मान्यता देण्यात आली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी नियुक् करण्यात आलेल्या आपदा मित्र ट्रेनी फायरमन यांच्या मानधनासाठी आवश्यक तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. आपत्कालीन रिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहावे, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील स्वच्छता, देखभालउद्यान व्यवस्थापनाच्या कामास मुदतवाढ देण्या मान्यता देण्यात आली. यामुळे क्रीडा सुविधांची योग्य देखभाल होऊन खेळाडूंना आवश्यक सुविधा पलब्ध राहण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन दे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.