पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा व्यवस्थापनाचा नवा अध्याय सुरू ; आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते ‘नवी दिशा – शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पाचे’ भूमिपूजन संपन्न!

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा व्यवस्थापनाचा नवा अध्याय सुरू ; आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते ‘नवी दिशा – शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पाचे’ भूमिपूजन संपन्न!

पिंपरी-चिंचवड, 08 ऑगस्ट 2026 : शहरातील दत्तनगर येथे पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा नवा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या 'नवी दिशा - शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प' या पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्याच महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार श्री. अमित गोरखे यांच्या हस्ते गुरूवारी,  06 ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहीवातावरणात पार पडला. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
शहरातील पहिला प्रकल्प: हा उपक्रम शहरातील झोपडपट्टी, तसेच इतर सर्व भागातील कचरा व्यवस्थापनासाठी राबविला जाणारा पहिलाच अभिनव प्रकल्प आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन: कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प वैज्ञानिक पद्धतीने राबविला जात आहे.
लोकसहभाग: हा केवळ स्वच्छतेचा उपक्रम नसून लोकसहभागातून उभारला जाणारा एक शाश्वत विकासाचा आदर्श पॅटर्न आहे.
कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन काळाची गरज
'स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या आपल्या संकल्पाला हा प्रकल्प अधिक बळ देणार आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन काळाची गरज आहे. हा उपक्रम दत्तनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडसाठी विकासाची नवी दिशा ठरत असून, भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार संपूर्ण शहरात केला जाईल,' असा विश्वास आमदार श्री. अमित गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्री. विजय सूर्यवंशी, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, नगरसेवक श्री. तुषार हिंगे, नगरसेविका सौ. सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक श्री. कुशाग्र कदम, क्षेत्रीय अधिकारी श्रीमती निवेदिता घार्गे, आरोग्य अधिकारी श्री. राजू साबळे, आकार सोल्युशन्सच्या सौ. विजया कुचेकर आणि सायडा संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्रीराम सेवा ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.