१३/०८/२०२3
पुणे महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर चौक येथील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा आज मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. शास्त्रीनगर चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पाच्या कामास गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारास दिल्या.
सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणीनगर व गुंजन चौकाच्या दिशेने जाते. या मार्गांवरील वाहतुकीचा मोठा भार शास्त्रीनगर चौक परिसरात येत असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्त्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी ग्रेड सेपरेटरच्या कामास गती देऊन सदर काम चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाचे काम मार्च २०२७ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कंत्राटदारास देण्यात आले.
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रोडवरील शास्त्रीनगर चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नगर रोड, कल्याणीनगर, गुंजन चौक, गोल्फ चौक तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या परिसरातील वाहतूक प्रवाह अधिक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलीस विभाग व इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून वाहतुकीची सुरक्षितता, आवश्यक तांत्रिक बाबी आणि नियोजनाची पूर्तता राखत कामास गती देण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी दिल्या आहेत.