१३/०८/२०२६
पुणे महानगरपालिकेच्या मुकुंदराव आंबेडकर चौक (विश्रांतवाडी जंक्शन) येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची आज मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामामध्ये श्री रामेश्वरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे निर्माण होणारा अडथळा मा. आयुक्तांना जागेवर समजावून सांगण्यात आला. सदर अडथळ्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम नियोजित गतीने पुढे नेण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
यावर मा. आयुक्तांनी सदर विषय एका महिन्याच्या आत निकाली काढण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे व पिंपरी चिंचवड (SRA), बांधकाम विकास विभाग ,नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग तसेच संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक व संयुक्त जागा पाहणी आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रकल्पामुळे पाणीपुरवठा वाहिनी व विद्युत केबल स्थलांतरित करणेसाठी जागा उपलब्ध करणेसाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रकल्प क्षेत्रामधील पुणे आळंदी रस्यावरील टँक रोड वरील विक्रेते (hawkers/vendors) यांचे अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. सदर अतिक्रमणे तात्काळ हटवून तसेच परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणेसाठी fix point लावणेबाबत अतिक्रमण विभागास मा. आयुक्तांनी निर्देश दिले.
प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात चौकातील वाहतूक वळविल्यानंतर चौक व आळंदी रस्ता बाजूकडील उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारास देण्यात आल्या.
मा. आयुक्तांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन कंत्राटदारास सर्व आवश्यक बाबींची पूर्तता मुदतीत पूर्ण करून डिसेंबर २०२६ अखेर विषयांकित उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्प वाहतुकीस खुला करून देणेबाबत आदेश दिले.
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विश्रांतवाडी चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन विमानतळ, आळंदी रस्ता, धानोरी, लोहेगाव व नगर रोड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्प विभागामार्फत वाहतूक पोलीस विभाग व इतर संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून कामाचे नियोजन करीत असून, वाहतुकीची सुरक्षितता व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता राखून प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जागा पाहणीसाठी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री अनिरुद्ध पावसकर, मा नगरसेवक श्री सुहास टिंगरे,मा. मुख्य अभियंता (प्रकल्प विभाग), श्री. दिनकर गोजारे, मा. मुख्य अभियंता (पथ विभाग), श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त (परिमंडळ क्र. १) श्रीमती आशा राऊत, मा. उपायुक्त (अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग) , श्री. सोमनाथ बनकर, मा. उप जिल्हाधिकारी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) सक्षम प्राधिकारी, श्रीमती अर्चना यादव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.jpeg)