आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या आजचं राशिभविष्य

0 झुंजार झेप न्युज


झुंजार झेप  | ज्योतिषशास्त्र

▪  मेष - आपण कोणत्याही प्रकारे माध्यमांशी संबंधित असाल तर आज आपणास यशाची फळे चाखावयास मिळतील असे गणेशाचे भाकीत आहे. सर्व लक्ष आपल्यावरच केंद्रित असल्याने आपले कौशल्य दाखविण्यास हीच वेळ योग्य ठरेल. आपल्या कौशल्यास ओळख मिळेल व आपल्या अल्पकालीन ध्येयांची फलप्राप्ती होईल.

▪  वृषभ - आजचा दिवस आश्चर्याने भरलेला आहे. अचानकपणे व अनपेक्षितपणे होणाऱ्या कार्यक्रमातील बदलासाठी तयार राहा. आजचा दिवस अर्थपूर्ण कृती करण्याचा नाही. सर्व मोठे कार्यक्रम व निर्णय उद्यावर ढकलण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे. आपणास काही अवघड आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता असून त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या तत्वांशी तडजोड करणे हा एकमेव उपाय ठरेल. प्रत्येक गोष्टीत दुसऱ्या पर्यायाचा विचार केल्याशिवाय त्यास प्रतिसाद न देण्याचा प्रयत्न करा.

मिथुन - आजचा दिवस आपल्या भावना आपले प्रियजन व मित्रां समोर प्रकट करण्यास तसेच आपले विचार व मत ह्यांना खाजगी स्वरूपात ठेवण्यास चांगला आहे. आज आपला विनयशील व दयाळू स्वभाव बाहेर येईल. आज आरोग्य व आहार हा मुद्दाच नसल्याचे गणेशा सांगत आहे.

▪  कर्क - कार्यालयात आपण एकाग्रचित्त होऊन कामे कराल. त्यामुळे कामे लवकर पूर्ण होतील. आपले जीवन एका नवीन वळणावर असून आपणास त्यात स्नेहभाव व आनंद असल्याचे जाणवेल. आपणास प्राविण्य प्राप्त होईल, असे गणेशा सांगत आहे.

सिंह - तुम्ही जरी वातावरणास दोष दिलात तरीही थोड्याफार फरकाने आपली शक्ती वाढली असे आपणास वाटत राहील असे गणेशास वाटते. मात्र त्याने कामाच्या ठिकाणी भांडणे होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे नवीन कोणत्याही कामाची सुरवात करू नका. आपण आपल्या नातलगांबरोबर चांगला वेळ काढण्याची व्यवस्था केल्यास संध्याकाळ नंतर परिस्थितीत बदल होताना दिसून येईल असे गणेशास वाटते.

कन्या - आज नशिबाची चांगली साथ लाभेल. आज जेथे हात घालाल तेथे यश मिळवाल असे गणेशा सांगत आहे. काही ठिकाणी आपणास विशेष अपेक्षा नसताना हि काही चांगल्या परिणामांची शुभ बातमी मिळेल. लवचिकता व तडजोड नम्रपणे स्वीकारल्यास इतरांचा पाठिंबा मिळवू शकाल.

तुळ - आपल्यापैकी जे स्वयं रोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आज आर्थिक बाबतीत चांगला दिवस असल्याचे गणेशा सांगत आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होऊन आपल्या क्षमतेचे कौतुक करतील. आपण स्वतंत्रपणे किंवा कोणाच्या हाताखाली काम करत असलात तरी आजचा दिवस आपलाच असेल.

▪  वृश्चिक - आपल्या प्राप्तीतील बुडीत कर्ज आपण बाजूला सारले असले तरीही अनपेक्षितपणे त्याची वसुली व्यापारातून करण्यात येण्याची शक्यता असल्याचे भाकीत गणेशा करत आहे. घर व कार्यालय ह्या दोन्ही ठिकाणी आपणास समतोल साधावा लागेल. व दोन्ही ठिकाणी आपण योग्य व्यवस्थापन करू शकलात ह्याचा आपणास आनंद सुद्धा होईल.

▪  धनु - आज कामाच्या ठिकाणी आपल्या उपजत बुद्धी चातुर्याचे कौतुक होऊन एखादे बक्षीस मिळण्याची शक्यता असल्याचे भाकीत गणेशा करीत आहे. दुपारी आपले सहकारी आपणास फूस लावण्याचा प्रयत्न करतील. परंतु, दिवस अखेरीस वरिष्ठ आपणास सकारात्मक स्फूर्ती देऊन एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवतील. यशाने हुरळून जाऊ नका.

▪  मकर - दररोज आपली मनःस्थिती हेलकावे घेत असल्याचे आपणास जाणवत नाही. खरे तर हे फार दुर्मिळ आहे. परंतु आजचा दिवस त्या दुर्मिळ दिवसांपैकीचा एक दिवस आहे. लहान - सहान गोष्टीने आपली चिडचिड होऊन आपणास त्रास होत असल्याचे जाणवेल. हे काही फारवेळ टिकणार नाही. दिवस अखेरीस आपल्यात स्फूर्ती येऊन कोणताही धोका पत्करण्यास आपली तयारी असेल, असे गणेशा सांगत आहे. आपले असे व्यक्तिमत्व आहे कि जे सर्वाना हवेहवेसे वाटते.

▪  कुंभ - साधारणपणे आपणच इतरांना मदत करत असता, परंतु आज तसे होणार नाही. आपल्यावर कामाचा भार असेल व कोणीही आपणास मदत करू शकणार नाही. परंतु, निराश होऊ नका, आपल्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची खात्री गणेशा आपणास देत आहे. आपली वचनबद्धता व कामगिरी इतरांना पाऊल उचलण्यास प्रवृत्त करेल.

▪  *lमीन - आज आपल्यावर अतिरिक्त जवाबदारीचे जे ओझे आहे ते सांभाळून यशस्वी व्हावयाचे असल्यास आपणास काही गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल, असे गणेशा सांगत आहे. आपली निराशा बाहेर पडू न देण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने फक्त हाताखालील लोकांना टोचणी लागून आपण ज्यादा काम केले असे वाटेल व ते ज्यादा पैश्यांची मागणी करण्यास पात्र असल्याची त्यांची भावना होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.