आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भावाला मंत्रीपद मिळालं नाही. त्याचमुळे ते बेताल वक्तव्य करत आहेत. मात्र महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल काही वाकडं बोलालं तर जीभ राहणार नाही, असा इशारा भाजपचे नेते नारायण राणे यांनी दिला आहे.
आम्ही आज फक्त संजय राऊतांना इशारा देतोय. यापुढे अशी वक्तव्य केल्यास यादा राखा, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
संजय राऊतांना सत्तेचा माज चढलाय. भावाला मंत्रिपद न मिळाल्याने ते अशी बडबड करतायेत आणि त्याचमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असा निशाणाही राणेंनी यावेळी साधला.
दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते आणि उदयनराजे समर्थक महारष्ट्रभर जोरदार आंदोलन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.